Monday, July 1, 2013

भजन - तेरा रामजी करेंगे बेडा पार

तेरा रामजी करेंगे बेडा पार ... 

तेरा रामजी करेंगे बेडा पार
उदासी मन काहे को धरे

काहे को धरे रे, काहे को डरे
तेरा रामजी करेंगे बेडा पार

नैया तेरी राम हवारे
लहर लहर हरी आप संभारे
प्रभु आप ही उठावे तेरा भार
तेरा रामजी करेंगे बेडा पार
उदासी मन काहे को धरे
काहे को धरे रे, काहे को डरे

काबू में मंझधार उसीके
हाथों में पतवार उसीके
तेरी हार भी नहीं है तेरी हार
तेरा रामजी करेंगे बेडा पार
उदासी मन कहें को धरे
काहे को धरे रे, काहे को डरे

सहज किनारा मिल जायेगा
परम सहारा मिल जायेगा
डोरी सौंप के तो देख एक बार
तेरा रामजी करेंगे बेडा पार
उदासी मन कहें को धरे
काहे को धरे रे, काहे को डरे

तू निर्दोष तुझे क्या डर है
पग पग पर साथी इश्वर है
सच्ची भावना से करले पुकार
तेरा रामजी करेंगे बेडा पार
उदासी मन कहें को धरे
काहे को धरे रे, काहे को डरे
तेरा रामजी करेंगे बेडा पार

Sunday, June 30, 2013

SANDIP KHARE KASE SARTIL SAYE LYRICS (कसे सरतील सये,)

कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाचे फुल दोन्, रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा
रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे
उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम
चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच
आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या
तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून 
जातांनाही पायभर मखमल ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे
माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत
वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना
तेंव्हा नभ धरासारी भिजवेल ना?

गुलाबाचे फुल दोन्,रोज रात्री डोळ्यावर

मुसुमुसु पाणी सांग भरतील ना?

lyrics are property and copyright of it's owners (SANDIP KHARE)and are provided for educational purposes only.

To Ani Ti तो आणि ती....- Poem by Mangesh Padgonkar




असा मी तसा मी कसा मी कळेना !!! Vinda




कधी येत असे क्षुद्रता कस्पताची
कधी वाढता वाढता व्योम व्यापे

कधी वस्र्षातो अमृताच्या सरी अन 
कधी मृत्यूची भाबडी भीती मागे

कधी गर्जतो सागराच्या बळाने
कधी घाबरतो बोलता आपणासी

कधी आपणा सर्व पिंडास शोधे
कधी पाहतो आत्म रुपात सारे

कधी मोजतो आपणास अनंते
अणुरूप घेती जिथे सूर्य तारे

टळे ना अहंकार साध्या कृतीचा
गळे ना महापृच्ह स्वार्थी स्मृतीचे

कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे 
कधी सत्य ते सोंग साजे

कधी संयमी संशयात्मा विरागी
कधी अनंताची चिंता ग्रासवी

असा मी तसा मी कसा मी कळेना 
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी !!



दमलेल्या बाबाची कहाणी ... Damlelya Babachi hi kahani

कोमेजून  निजलेली  एक  परी  राणी ,
उतरले  तोंड  डोळा  सुटलेले  पाणी  ||2||

ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला

रोजचेच  आहे  सारे  काही  आज  नाही
माफी  कशी  मागू  पोरी  मला  तोंड  नाही
झोपेतच  घेतो  तुला  आज  मी   कुशीत
निजतच  तरी  पण  येशील  खुशीत
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला 
.....
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

आट-पाट नगरात  गर्दी  होती भारी
घामाघूम  राजा  करी  लोकलची  वारी  ||2||
रोज  सकाळीस  राजा  निघताना  बोले ,
गोष्ट  सांगायचे  काल  राहुनिया  गेले
जमलेच  नाही  काल  येणे  मला  जरी
आज  परी  येणार  मी  वेळेतच  घरी
स्वप्नातल्या  गावा  मध्ये  मारू  मग  फेरी
खरया खुऱ्या परी  साठी  गोष्टीतली  परी
बांधीन  मी  थकलेल्या  हातांचा  झुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....

ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

ऑफिसात  उशिरा  मी  असतो  बसून     
भंडावले  डोके  गेले  कामात  बुडून          
तास  तास  जातो  खाली   मानेने निघून 
एक  एक  दिवा  जातो  हळूच  विजून      
अशावेळी  काही  सांगू  काय काय वाटे    
आठवा  सोबत  पाणी  डोळ्यातून  दाटे    
वाटते  कि  उठूनिया  तूज पास  यावे       
तुझ्यासाठी  मी  पुन्हा  लहानगे   व्हावे   
उगाचच  रुसावे   नि  भांडावे  तुझाशी      
चिमुकले  खेळ  काही  मांडावे  तुझाशी 





उधळत खिदळत  बोलशील  काही
बघताना  भान  मला  उरणार  नाही  ||2||
हासुनिया  उगाचच  ओरडेल  काही
दुरूनच  आपल्याला  बघणारी  आई
तरी  सुद्धा  दोघे  जन  दंगा  मांडू  असा
क्षणा  क्षणा  वर  ठेवू  २ खोडकर  ठसा
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला .....


ला ..ला  ला  ला  ला , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||


दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभई 
मऊ-मऊ  दूध  भात  भरवेल  आई  
गोष्ट  ऐकायला    मग  येशील  ना  अशी
सावरीच्या   उशीहून  मऊ  माझी  कुशी



कुशी  माझी  सांगत  आहे  ऐक बाळा  काही
सदोदित  जरी  का  मी  तुझ्या पास  नाही
जेऊ  
खाऊ  न्हाऊ  माखू  घालतो  ना  तुला
आई  परी  वेणी -फनी  करतो  ना  तुला  ||2||
तुझ्यासाठी  आई  परी  बाप पण  खुळा
तरी  हि   कधी  गुप  चूप  रडतो  रे  बाळा 
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....


ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।

बोळक्या मध्ये  लुक -लुकलेला  तुझा  पहिला  दात
आणि  पहिल्याधाच  घेतलास  जेव्हा तोंडी  मऊ  भात
आई  म्हणण्याआधी  सुद्धा  म्हणली  होतीस  बाबा
रंगात -रांगत घेतलास  जेव्हा  घराचा  तू  ताबा
लुटू -लुटू  उभा  राहत  टाकलस पाउल  पहिलं
दूरचं पाहत  राहिलो  फक्त , जवळ   पहाईचच राहिलं


असा गेलो  आहे  बाळा  पुरा  अडकून
हल्ली  तुला  झोपेतच  पाहतो  दुरून  ||2||
असा  कसा  बाबा  देव  लेकराला  देतो
लवकर  जातो  आणि  उशिरानी  येतो
बालपण  गेले  तुझे  गुज  निसटून
उरे  काय तुझा  माझा  ओंझळी  मधून
जरी  येते  ओठी  तुझा  माझासाठी  हसे
नजरेत  तुझ्या   काही  अनोळखी  दिसे
तुझ्या   जगातून  बाबा  हरवेल  का  ग ?
मोठेपणी  बाबा  तुला  आठवेल  का  ग ? ||2||
सासुराला  जाता  जाता  उंबरठ्या  मध्ये
बाबासाठी  येईल  का  पाणी  डोळ्यामध्ये ?....



ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।

दूरदेशी गेला बाबा,Dur Deshi Gela Baba


दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभर दमवला
"आता पुरे ! झोप सोन्या.." कुणी म्हणतच नाही

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही.. कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही !

हे भलते अवघड असते ...

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला
हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...
तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...
तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...
कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...
हे भलते अवघड असते….

-- Salil Kulkarni, Sandeep Khare.