Wednesday, January 22, 2014

एकदा हास तु - सुरेश भट


एकदा हास तु - सुरेश भट

एकदा हास तु, एकदा हास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु

ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु

वेदनेला कुणी हाक मारु नये,
भेटलेल्या सुखा दुर सारु नये,
विसर ही काळजी विसरुनी आभास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु

एकटे मी तुला आठवावे किती,
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती,
दे जरासा तुझा मधुर सहवास तु,
हसत माझा मला परत दे श्वास तु

.........

No comments:

Post a Comment